Vishwa panthastha

विश्व पांथस्थ - एप्रिल १८ अंक प्रकाशित

'विश्व पांथस्थ' च्या एप्रिल २०१८ अंकाचे प्रकाशन मसाप चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. सोबत बदलापूरच्या 'ग्रंथसखा' वाचनालयाचे श्याम जोशी आणि ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर. जगभर विखुरलेल्या अनिवासी भारतीयांकरीता सर्वप्रथम मराठी भाषेतून "विश्व पांथस्थ" मासिक चालू झाले आहे, वाचकांकडून त्यासाठी प्रतिसाद उत्तम आहे. मूळ गाव व घर सोडून उपजीविकेसाठी जगभर गेलेला, स्थलांतरित झालेला अनिवासी भारतीय म्हणजे "विश्व पांथस्थ". महाराष्ट्र सोडून परराज्यात व परदेशात गेलेला मराठी माणूस हा देखील पांथस्थ व परराज्यातून महाराष्ट्रात उपजीविकेसाठी येऊन "मराठी" झालेला माणूस देखील "पांथस्थ"च. अनिवासी भारतीयांकारता मराठी मासिक प्रकाशित करण्याचा बहुधा हा पहिला प्रयत्न असावा. अधिकृतरीत्या युएई मध्ये वितरीत होणारे विश्व पांथस्थ हे निश्चितच पहिले मराठी मासिक आहे. या मासिकाचे संपादन व प्रकाशन भारतातून तर याचे वितरण जगभर होत आहे. यु ए ई, बहरीन, ओमान, भूतान, अमेरिका, सिंगापूर येथे छापील अंक पोहचला आहे, बाकीही देशात लवकरच पोहोचेल. डिजिटल pdf अंकाचे वितरण तर अनेक देशात होत आहे. पहिल्या अंकाचे प्रकाशन व वितरण १६ सप्टेंबर २०१६ रोजी शारजा मध्ये एका मोठ्या समारंभात झाले. त्याचे पुनर्प्रकाशन भूतान येथे भरलेल्या साहित्य संमेलनात झाले. संपर्कासाठी email : editor@panthastha.com संपादक : डॉ संदीप कडवे कार्यकारी संपादक: रवींद्र गुर्जर, पुणे. मोबा. 9823323370