Vishwa panthastha

*विश्व पांथस्थ मासिकासाठी कार्यकारी संपादकाची गरज आहे* [पूर्ण वेळ/ अर्धवेळ / फ्री लान्स]

*विश्व पांथस्थ मासिकासाठी कार्यकारी संपादकाची गरज आहे* [पूर्ण वेळ/ अर्धवेळ / फ्री लान्स] विश्व पांथस्थ हे अनिवासी भारतीयांसाठी पहिले मराठी मासिक आहे. RNI तर्फे मराठी व हिंदी भाषेतून या मासिकासाठी मंजुरी आहे. मासिक पुण्यातून प्रकाशित होते. मासिकाला वाचकांचा, लेखकांचा व जाहिरातदारांचा वाढता प्रतिसाद व अपेक्षा निर्माण झाल्यामुळे मासिकासाठी कार्यकारी संपादकाची तातडीची गरज आहे. मासिक संपादनाचा, पत्रकारितेचा पुरेसा पुर्वानुभव असणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे सकारात्मक मनोभूमिका व तळमळीने काम करण्याची इच्छा असणे आवश्यक आहे. मासिकाची उद्दिष्टे लक्षात घेऊन त्याप्रमाणे अंकाची आखणी करणे, योग्य विषयावरचे लेख लिहून घेणे, प्रसंगी लिहिणे, यशस्वी व्यक्तिमत्वांची मुलाखत घेणे, वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करून त्यानुसार लेख लिहिणे, इतर पत्रकार, लेखक व कवी, अनिवासी भारतीय यांच्याशी संपर्क ठेऊन त्यांना साहित्य लिहिण्यास प्रवृत्त करणे व मार्गदर्शन करणे, मासिकाची वेबसाईट, सोशल नेटवर्क व मोबाईल अँप च्या क्षमतेचा पूर्ण वापर करून वाचक व सदस्य संख्या वाढवणे, मासिकाचा जगभरात विस्तार करणे, जाहिराती मिळवणे वा त्यासाठी योग्य नेटवर्क तयार करणे, वितरणाची जबाबदारी सांभाळणे, मासिक आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे , एक चांगली टीम उभी करणे या अपेक्षा आहेत. पांथस्थ तर्फे अनेक योजना राबवण्याचा मानस आहे. त्यात सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. संपूर्ण माहितीनिशी योग्य उमेदवारांनी आपला अर्ज त्वरित editor@panthastha.com या इमेल वर पाठवावा. तत्पूर्वी www.panthastha.com या वेबसाइट वर जाऊन विश्व पांथस्थ या मासिकाची योग्य ती माहिती जरूर करून घ्यावी. फ्री लान्स पत्रकार, स्पेस सेलिंग मधील अनुभव व धडाडी असण्याऱ्या उमेदवारांनी देखील संपर्क करावा. अनुभव व कामाची क्षमता यानुसार कामाचे स्वरूप ठरवता येईल. विविध देशातील व भारतातील विविध राज्यातील इच्छुकांनी देखील त्वरित संपर्क करावा