आखाती अनिवासी भारतीय नेहमीच धीराने चालणारा आहे. अनेक गोष्टींची अनिश्चितता त्यांना नेहमीच भेडसावत असते. पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे असे दिसते. आखातात आर्थिक मंदी येतेय का? किंवा आली आहे का? देशांचे उत्पन्न कमी झाले आहे. सध्या पुन्हा ऑइल चे भाव वाढत आहेत, पण ते किती काळ टिकतील माहित नाही व त्याच परिणाम दिसेपर्यंत वेळ लागेल. तो पर्यंत किती कुटुंबे, किती कंपन्या तग धरू शकतील हा खरा प्रश्न आहे.